Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : जैसे कर्म तैसे फळ..! हत्येच्या गुन्ह्यात होता फरार, चोरी करताना १४व्या मजल्याहून पडला

Fugitive accused in murder case falls to death while stealing : हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला चोरी करतानाच मृत्यूने गाठल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

एखाद्या गुन्हेगाराचा अंत्यंत वाईट पद्धतीने झाल्याच्या अनेक घटना आपण पाहातो. बऱ्याचदा गुन्हेगाराचे साथीदारच त्याचा काटा काढतात अशा घटना देखील आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार एका गुन्हेगाराबाबत झाला आहे. हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला चोरी करतानाच मृत्यूने गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय बाईत असे या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी परिसरात राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अक्षय हा विक्रोळी टागोरनगर परिसरातील मधुबन सोसायटीत चोरीच्या उद्देशाने शिरला होता. पण या वेळी चोरी करताना १४ व्या माळ्यावर अक्षयचा पाय घसरला आणि इमारतीवरून तो थेट खाली कोसळला. या दुर्घटनेत पडून त्याचा मृत्यू झाला. याबद्दलची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली आहे. अक्षयवर या पूर्वीच हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हत्येचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

दोनच दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणाला विवस्त्र करून त्याला मारहाण करत त्याची हत्या केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच वायरल झाला होता. हत्येनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह हा कसारा येथे टाकला होता. या गुन्ह्यात इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यात अक्षय हा फरार आरोपी होता. दरम्यान आज त्याचा चोरी करताना इमारतीच्या १४ व्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात मृत्यू झाला असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT