Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : 29 वर्षापुर्वीचा फरार आरोपी छोटा राजन टोळीच्या गुंडाला क्राईम ब्रांचकडून अटक

29 वर्षांपूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - 29 वर्षांपूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. साकीर बरकत अली लखानी असे आरोपीचे नाव असून आरोपीविरोधात मुंबई व गुजरातमध्ये 10 गुन्ह्यांची नोंद आहे. छोटा राजन टोळीच्या गुंडाला क्राईम ब्रांचकडून सुरतमधून अटक करण्यात आली आहे.

घटना थोडक्यात

1994 मध्ये आरोपी आणि त्याच्या छोटा राजन टोळीतील 4 साथीदारानी चेंबूर, सिंधी कॅम्प येथील एका इस्टेट एजंटच्या दुकानात घातक शस्त्रांद्वारे दरोडा टाकला होता. आरोपींना अडवण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी आरपी लखानीला अटक झाली होती.

सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु अटक आरोपीचे इतर 3 साथीदार पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. परिणामी सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढले होते.

पोलीस तपास

याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता आरोपी गुजरातमधील सूरत येथे लपला असल्याचे निष्पन्न झाले.गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुजरातला जाऊन तपास केला असता आरोपी ओळख लपवून राहत असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी पाळत ठेवत शुक्रवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.

10 हून अधिक गुन्हे

आरोपी लखानी छोटा राजन टोळीतील सदस्य असून त्याच्या विरोधात मुंबई व गुजरात येथे दरोडा, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी व फसवणुकीचे असे एकूण 10 गुन्हे नोंद आहेत. तसेच गुजरात येथील ओधव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून त्याची फरार आरोपी म्हणून नोंद आहे. आरोपी 1994 साली अ‍ॅन्टॉपहिल परिसरात राहत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट, गॅसदरवाढ आणि तुटवड्याने जगणं कठीण

SCROLL FOR NEXT