ग्रामपंचायतींच्या तिजोरीत खडखडाट असतानाच ठाणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून मिळालाय 'इतका' निधी! 
मुंबई

ग्रामपंचायतींच्या तिजोरीत खडखडाट असतानाच ठाणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून मिळालाय 'इतका' निधी!

शरद भसाळे

भिवंडी : कोरोनाच्या आपत्तीनंतर लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत थेट केंद्र सरकारकडून निधी येणार आहे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ठाणे जिल्ह्यातील गावांना पहिल्या हप्त्यात 22 कोटी 22 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. 

केंद्र सरकारकडून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. कोरोनाच्या आपत्तीत ग्रामपंचायतींच्या तिजोरीवर मोठा भार पडला. आधीच तुटपुंजे उत्पन्न, त्यात करवसुली ठप्प झाल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार जवळजवळ ठप्प झाला होता. या काळात ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळाल्यास दिलासा मिळणार होता. त्यानुसार केंद्र सरकारकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याचा ठाणे जिल्हा परिषदेकडे 22 कोटी 22 लाख रुपयांचा निधी जमा झाला. आता 80 टक्के निधीचे थेट 403 ग्रामपंचायतींना वाटप केले जाईल. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वाट्याला प्रत्येकी 10 टक्के निधी येणार आहे, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. 

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार असलेली कामे आणि उपक्रमांची अंमलबजावणी करता येणार आहे. विशेषत: कोरोनाच्या आपत्तीचा शहरांबरोबरच ग्रामीण भागालाही मोठा फटका बसला. घरपट्टी-पाणीपट्टी प्रलंबित असल्यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे करता येत नव्हती. मात्र, आता केंद्र सरकारकडून पहिल्या हप्त्यातील 15 व्या वित्त आयोगाचा निधी आल्यामुळे विकासकामे वेगाने होणार आहेत. 
- कपिल पाटील, खासदार.

---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT