Funding of Rs 4 crore to old bridge river Valdhuni Ulhasnagar Deepak Sirwani mumbai sakal
मुंबई

उल्हासनगरात वालधुनी नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवालुक; दीपक सिरवानी

पुलाचे पाडकाम करून नव्याने बांधणी, ओव्हरफ्लोतून सुटका

दिनेश गोगी

जेसीबीच्या मदतीने पुलाच्या पाडकामास सुरवात करण्यात आली आहे.नवा पूल हा आणखीन काही फूट उंच आणि अरुंद केला जाणार असून दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधण्यात येणार असल्याने हा पूल नव्यालुकात दिसणार असा विश्वास टोनी सिरवानी यांनी व्यक्त केला...

उल्हासनगर : रेल्वे स्थानका जवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीवरील जुन्या पुलाचे पाडकाम करून त्याची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. माजी स्थायी समिती सभापती दीपक(टोनी) सिरवानी यांच्या प्रयत्नाने पालिकेने दिलेल्या 4 कोटी रुपयांच्या निधीतून पुलाला नवालुक मिळणार असून ओव्हरफ्लोतून सुटका होणार आहे.आज या पुलाचा भूमिपूजन सोहळा थाटामाटात पार पडला आहे.

स्टेशन ते गौशाला मार्गे पुढे जाणारा हा वालधुनी नदीवरील पूल अंदाजे 38 वर्ष जुना आहे.नदीच्या पात्रावर हा पूल तीनचार फुटच उंच असल्याने दर पावसाळ्यात ओव्हरफ्लो अशी परिस्थिती निर्माण होत होती.पुरात हा पूल सातत्याने बंद ठेवण्यात येत होता.पुलावरून पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.पुराच्या पाण्याने पुलाचे संरक्षण कठडे कठ्ठे तुटून तडे गेले होते.मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांसोबत जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येत होती.

त्यामुळे या पुलाची नव्याने बांधणी करण्याची मागणी वालधुनी नदीसाठी सातत्याने उपक्रम राबवणारे शशिकांत दायमा,अनुष्का शर्मा आदींनी आयुक्त डॉ.राजा दयानिधी,दीपक(टोनी)सिरवानी हे स्थायी समिती सभापती असताना त्यांच्याकडे केली होती.सिरवानी यांनी शहर अभियंता महेश सितलानी,उपअभियंता संदीप जाधव यांच्यासोबत या पुलाची पाहणी करून त्याची दुरावस्था आयुक्तांना सांगितल्यावर डॉ.दयानिधी यांनी तातडीने 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

आज आमदार कुमार आयलानी,माजी स्थायी समिती सभापती दीपक(टोनी) सिरवानी,भाजपा जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी,सरचिटणीस मनोहर खेमचंदानी,माजी नगरसेवक लाल पंजाबी,नाना पवार,राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे,सामाजिक कार्यकर्ते पिंटो बठीजा,रमेश आहुजा,वालधुनी बिरादरी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शशिकांत दायमा,कंत्राटदार प्रेम झा,रिक्षाचालक आदींच्या उपस्थित या नव्याने बांधणी करण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे.

जेसीबीच्या मदतीने पुलाच्या पाडकामास सुरवात करण्यात आली आहे.नवा पूल हा आणखीन काही फूट उंच आणि अरुंद केला जाणार असून दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधण्यात येणार असल्याने हा पूल नव्यालुकात दिसणार असा विश्वास टोनी सिरवानी यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT