मुंबई

येत्या काळात कोणतंही संकट आलं तरी मुंबईतील 'हे' रुग्णालय आहे सज्ज; काय आहे तयारी, कोणतं आहे रुग्णालय?

भाग्यश्री भुवड

मुंबई, 12 : कोरोनाचा विषाणू बाहेरच्या देशातून मुंबईत दाखल झाला. या विषाणूशी लढा देण्याची पहिली जबाबदारी पालिका रुग्णालयांच्या खांद्यावर आली. सुरुवातीला कोरोनावर नियंत्रण करणे आव्हात्मक काम होते. मात्र कोरोनाने रुग्णालयांना खूप काही धडे दिलेत. त्यामुळे भविष्यात अशा संसर्गजन्य रोगासाठी केईएम रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणासह सज्ज असणार आहे. संसर्गजन्य आजारासाठी विषेश अभ्यासक्रम आखण्याचा  केईएमचा विचार आहे.

केईएम रुग्णालयात 2 मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर रुग्णालयाचे तीन मुख्य टप्प्यात रुग्णांचे नियोजन केले गेले. रुग्णसंख्या वाढीनुसार वार्डची संख्या वाढवली गेली. या काळात केईएममध्ये फक्त मुंबईतूनच नाही तर पालघर, सुरत, दहिसर, बोईसरसारख्या उपनगरातून रुग्ण यायचे. कोरोना संसर्ग आता ओसरला आहे. मात्र रुग्णालयाने भविष्यातील अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्य़ासाठी व्यापक धोरण आखले आहेस, अशी माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेंमत देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाने स्वत:ची काळजी घ्यायले शिकवले

कोरोनाने स्वत:ची आणि आपल्या टीमची काळजी घेण्याचा महत्वाचा धडा दिला. एखाद्या महामारीशी लढा द्यायचा असेल तर प्रामुख्याने  5 तज्ज्ञ डॉक्टर्स असणे गरजेचे असते. त्यात पल्मनोलॉजी, डायबिटीस स्पेशालिस्ट, चेस्ट मेडिसीन, फिजिशिअन, कार्डिओलॉजिस्ट आणि इंन्फेक्शन डिसीसेज स्पेशालिट येतात. प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसीन हा घटकही खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. 

रुग्णसंख्या 500 वर गेल्यावर सर्व रुग्णांना ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात आहे. 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून साधारणत: 13 किलोलीटरची अतिरिक्त ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली. व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता.

भविष्यासाठी केईएम तयार

केईएम हे मुंबईतील प्रमुख रुग्णालय आहे. वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय असल्यामुळे निवासी आणि पदव्युत्तरर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी इथे शिकतात. कोरोनासारख्या महामारीसारख्या मोठ्या विषयासाठी डीएनबी किंवा एमडीनंतर तीन वर्षाचा फुलटाईम कोर्स सुरू करण्याचा विचार रुग्णालयाचा आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईसाठी  संसर्गजन्य आजार स्पेशालिस्ट तयार होतील. याचा फायदा भविष्यातील कुठल्याही संसर्गजन्य आजाराला हरवण्यासाठी होऊ शकेल.

आयसीयू खाटा वाढवणार

प्रमुख रुग्णालय कायम कोणत्याही महामारीसाठी सज्ज राहिल यासाठीची तरतूद केली गेली आहे. आयसीयूचे 250 बेड्सची संख्या 500 पर्यंत करण्याचे नियोजन केले जात आहे.

केईएम रुग्णालयाबाबत 

  • एकुण - 5 
  • खाटांची संख्या - 2,250
  • सुसज्ज वॉर्ड्स, आयसीयूसारख्या वॉर्ड्सची सुविधा
  • व्हेटिलेंटर्स- 315
  • आयसीयू खाटा- 250 ते 275
  • डॉक्टर्स -1000  विद्यार्थी, पीजी/यूजी
  • चतुर्थ श्रेणी कामगार -2000
  • परिचारिका - 1000
  • डॉक्टर्स / प्राध्यापक - 350

व्यावसायिक अभ्य़ासक्रम सुरु करणार

आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी नर्सेस आणि डॉक्टर्स यांची मर्यादित संख्या असते. पण, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने दोन ते तीन नवीन अतिरिक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार आहे. सदर व्यक्ती डॉक्टर असिस्टंट म्हणून काम करेल. महामारीच्या वेळी रुग्ण जेव्हा विलगीकरण कक्षात जाईल तेव्हा त्याच्यासोबत बोलण्यासाठी, त्याच्या मदतीसाठी हा व्यक्ती उपलब्ध असेल. त्यासंदर्भातील प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहे.

कोरोना काळात ज्या सुविधा सुरू केल्या गेल्या त्या आता कायम राहणार आहेत. जागेच्या अडचणीमुळे  कोणताच वॉर्ड कायमस्वरुपी तसाच ठेवता येत नाही. पण, सुविधा कायम राहतील. लसीकरणात ही बूस्टर डोस येत्या काळात येण्याची शक्यता आहे. दोन डोस घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी बूस्टर डोस घेतल्यानंतर कोरोना पुन्हा होणार नाही.

नवीन मशीन

हाय फ्लो नेसल कॅनूला - ही मशीन अधिक दबावात रुग्णाच्या फुप्फुसात ऑक्सिजन डिलीवर करतो.

mumbai news for future virus threat mumbais KEM hospital is all set to fight and take care of mumbaikar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

Pakistan’s Vada Pav Girl: खातो की नेतो? दिल्ली नंतर आता पाकिस्तानमधील वडापाव दिदी झाल्या व्हायरल, चक्क ८० रुपयांचा वडा...

Latest Marathi News Live Update: CM कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांचा चोप

Srikanth film Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ ची जादू; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

IPL 2024: बोले जो कोयल... आयपीएलचं वातावरण तापल्यामुळे दिग्गज खेळाडूंची होतेय चांदी, नव्या जाहिरातींनी केले मालामाल

SCROLL FOR NEXT