dharavi 
मुंबई

बापरे! धारावीसह जी- उत्तर विभागात कोरोनाचा हाहाकार ;आतापर्यंत तब्बल 90 जणांचा मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाग्रतांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत मुंबईत तब्बल ४० हजारांच्या वर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यात काही वस्त्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईच्या जी-उत्तर या वॉर्डात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. 

जी-उत्तर वॉर्डात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 2716 वर पोहोचली आहे. तर मृतांच्या आकडा 90 वर इतका झाला आहे. धारावीत कोरोना रूग्णवाढ सुरूच असून धारावीत गेल्या 24 तासांत 25 रुग्णांची भर पडली असून  धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 1830 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 धारावीत आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने मृतांचा आकडा 71 वर स्थिर राखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र रुग्णवाढ सुरूच असून रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मात्र रुग्णवाढीचा दर नियंत्रणात येत असल्याचे दिसते. 

तर माहीम मध्ये 25 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्णांची  संख्या 549 तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दादर मध्ये आज 11 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या  337 झाली आहे. तर दादर आतापर्यंत 12 दगावले आहेत. तीनही परिसर मिळून जी उत्तर विभागातील आज 61 रुग्ण सापडले असून रुग्णांचा आकडा 2716 तर मृतांचा आकडा 90 इतका आहे
g north ward has most corona patients in mumbai read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT