Gajanan Kirtikar Esakal
मुंबई

Gajanan Kirtikar: ‘भाजपवर नाराजी, पण...’, मुलाविरुद्ध प्रचार करणाऱ्या गजानन कीर्तिकरांचा ED कारवाईवरून आरोप

Gajanan Kirtikar: भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माझ्या मुलाला अकारण लक्ष्य केले असल्याचा आरोप खा.गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे यंदाची लोकसभा निवडणूक लढणारा मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पण सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशीवर ते कमालीचे नाराज आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माझ्या मुलाला अकारण लक्ष्य केले असल्याचा आरोप खा.गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ते म्हणाले, की कोरोना काळातील कोणत्याही गैरव्यवहाराशी मुलगा अमोल कीर्तिकर याचा कसलाही संबंध नाही. त्यात काहीही काळेबेरे नसताना अमोलला चौकशीसाठी बोलावले जाणे हे वाईट आहे. भाजप ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर करते आहे, ते योग्य नाही. अमोल आणि मी एकाच घरात रहातो. आम्ही भोजनाच्या टेबलवर एकत्र असतो. मात्र तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमवेत राहणार असल्याने मी विरोधात प्रचार करणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चाललेली शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भलत्याच दिशेला वळवली. हा बदल मला मान्य नव्हता. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध राहिले नाहीत. ते योग्य प्रकारे संवाद ठेवत नव्हते. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांनी उठाव करताच त्यांच्यासमवेत गेलो. अमोल तिथेच राहून त्यांच्याकडून उमेदवार झाला आहे. मी त्याच्या विरोधात प्रचार करणार हे निश्चित’, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT