Railway 
मुंबई

एक्‍स्प्रेस थांबवून रुळावर लघुशंका

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा - ‘गांधीधाम एक्‍स्प्रेस’च्या मोटरमनने रेल्वे थांबवून ट्रॅकवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वसई-नालासोपारा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली. जागरूक नागरिक राज दसोनी यांनी याचा व्हिडीओ काढल्याने घटनेची वाच्यता झाली आहे. 

‘गांधीधाम एक्‍स्प्रेस’ शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाताना नालासोपारा रेल्वेस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर थांबली होती. या एक्‍स्प्रेसचा मोटरमन चक्क खाली उतरून ट्रॅकवर लघुशंका करीत होता. 

ट्रॅकच्या शेजारील रस्त्यावरून जाणारे जागरूक नागरिक राज दसोनी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा व्हिडीओ तयार केला. या घटनेने सुरक्षेच्या प्रश्‍नाबरोबरच मोटरमनसाठी रेल्वे गाड्यांमध्ये असलेल्या सुविधांचा मुद्दाही पुढे आला आहे.

संबंधित व्हिडीओ कोणत्या ठिकाणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीमध्ये दोन मोटरमन असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कसलीही तडजोड झाल्याचे वाटत नाही.
- गजानन महतपूरकर, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT