murbaad
murbaad 
मुंबई

गणेशोत्सव शांततेत पार पाडा : पोलीस अधिक्षक राजेंद्र मोरे

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे) : गणेशोत्सव शांततेत पार पाडा, कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिक्षक राजेंद्र मोरे यांनी शांतता कमिटीच्या मिटींग मध्ये केले. गणेशोत्सवाच्या काळात जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस खात्याची करडी नजर राहार असल्याची माहिती या वेळी मोरे यांनी  दिली.  

मुरबाड तालुक्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडावा या साठी मुरबाड पोलीस ठाण्यात शांतता कमिटी, नगर पंचायतीचे नगरसेवक व पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. हा उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी उपस्थितांकडून काही सूचना समजून घेत पोलीस खाते यासाठी काय उपाययोजना करणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक राजेंद्र मोरे यांनी दिली.

उत्सव काळात तालुक्यातील प्रत्येक गावात पोलिसांच्या गस्ती पथकाच्या माध्यमातून नजर राहाणार आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास करून जुगार खेळणे व मद्यप्राशन करणाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. मुरबाड शहर व ग्रामीण भागात पोलिस गस्त राहिल. विसर्जनाच्या मिरवणूकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस मित्रांबरोबर पोलिस कर्मचारी देऊन याकडे लक्ष ठेवले जाईल.

मुरबाड शहरातील बसस्थानकावर पोलीस कर्मचाऱ्यांची करडी नजर राहिल, असे अनेक पर्याय राबवले जाणार आहे. या मिटींगसाठी पोलीस निरीक्षक अजय वसावे, उपनिरिक्षक खरमाटे, नगराध्यक्षा शीतल तोंडलिकर, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, मा. उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, नगरसेवक रविंद्र देसले, रविद्र चंदने, हरेश पूरोहीत, राजा सरणोपत, नंदा गोडांबे,  व पत्रकार उपस्थित होते.            

गणेशोत्सव हा धार्मिक आहे. उत्सवात जागरण  करणासाठी जुगार हा पर्यय नाही. त्यासाठी भजन , किर्तन व शैक्षणिक उपक्रम राबवा.
- राजेंद्र मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुरबाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT