पूरग्रस्तांना गणेश मंडळांची आर्थिक मदत
पूरग्रस्तांना गणेश मंडळांची आर्थिक मदत 
मुंबई

गणेश मंडळांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर आल्यावर सामाजिक जाणीव ठेवून मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत केली आहे; मात्र बहुतेक मंडळांच्या उंच मूर्ती, आकर्षक देखावे आणि सजावटीचे काम जवळपास पूर्ण होत आले असल्याने ते आता तसेच राहणार आहे. पुरामुळे उत्सव साधेपणाने करण्यावर अनेकांचा भर राहील.

धर्मादाय आयुक्त किंवा समन्वय समिती आदींनी आवाहन करण्यापूर्वीच पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला. बहुतेक मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी दिली. कित्येक मंडळांनी पूरग्रस्तांना थेट जीवनावश्‍यक साहित्यही पाठवले. लालबागचा राजा मंडळाने २५ लाखांची देणगी दिली. त्यांचा कित्ता अनेक मंडळांनी गिरवून लाखांच्या देणग्या दिल्या. त्यानंतरही मदत करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला.

चिंचपोकळी मंडळाची पाच लाखांची मदत
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपये दिले. गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यातही त्यांनी पूरग्रस्तांसाठी वेगळ्या दानपेट्या ठेवल्या होत्या. त्या अद्याप उघडण्यात आलेल्या नाहीत. आता उत्सवादरम्यान मदतीसाठी काय करता येईल, ते ठरवण्यासाठी लवकरच मंडळाची बैठक होईल. कदाचित पुन्हा त्यासाठी वेगळी पेटी ठेवली जाईल, असे मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख संदीप परब म्हणाले.

‘मुंबईच्या राजा’तर्फे गृहोपयोगी वस्तू
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ ‘मुंबईचा राजा’ गणेशगल्ली तर्फेही पूरग्रस्तांसाठी तीन लाख रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू पाठवण्यात आल्या. नंतरही आम्ही पूरग्रस्तांना मदत करू, असे मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणाले. आमच्या सजावटीचे काम ६० टक्के पूर्ण झाले असल्याने आता ते रद्द करता येणार नाही. उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर आमचा भर असेल असेही त्यांनी सांगितले.

फोर्टचा राजा मंडळाकडून आगमन खर्च दान
फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने तर मूर्ती मंडपात आणतानाचा जंगी आगमन सोहळाच रद्द केला. अनेक मंडळे दोनतीन आठवडे आधी मूर्ती मंडपात आणताना सवाद्य मिरवणुका काढतात. मिरवणुकीवर मोठा खर्च होतो; मात्र फोर्टचा राजा मंडळाने सर्व बडेजाव न करता साधेपणाने मूर्ती आणली व तो वाचलेला खर्च पूरग्रस्तांसाठी वापरण्याचे ठरवले. त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकारण्यात येईल असेही जाहीर केले होते. मिरवणुकीत टेम्पो फिरवून गृहोपयोगी साहित्य जमा करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT