ganesh naik sakal
मुंबई

नवी मुंबई प्रभाग रचना; गणेश नाईक न्यायालयात दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या (Navi mumbai municipal corporation) आगामी निवडणुकीसाठी (election) करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने झाली आहे. याविरोधात भाजप (bjp) न्यायालयात जाणार असल्‍याचा इशारा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे प्रभाग रचनेतून दिसून येते आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रात ११ नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या १११ वरून १२२ वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली.

नव्या प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आमदार गणेश नाईक यांनी, प्रभाग रचना करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली आहे, असा आरोप केला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी सामील आहेत.

शहराच्या एकूण लोकसंख्येला प्रभागांनी भागून जे उत्तर येईल, तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले आहे. पालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता आमदार गणेश नाईक यांनी राज्यपाल, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या सर्वांना अगोदरच वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. तरी देखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली, दिघा या भागातील प्रभाग २३ हजार लोकसंख्येचे केले आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात जास्त प्रभाग झाले आहेत. तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३० हजार लोकसंख्येचे प्रभाग केल्याने या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची संख्या कमी झाली आहे.

प्रत्‍येक प्रभागासाठी स्‍वतंत्र याचिका

नवी मुंबईत १२२ प्रभागांपैकी अनेक प्रभागांमध्ये चुकीची रचना करण्यात आली आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. ज्या ज्या प्रभागात चुकीची रचना करण्यात आली आहे त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात असून निष्णात वकिलांची नियुक्ती करणार आहे. पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमाबाह्य प्रभाग रचना केली आहे, त्यांची चौकशी करावी आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

नियम डावलून प्रभागरचना

नवीन प्रभाग रचनेत तीन-तीन किलोमीटरचे प्रभाग तयार झाले असून आहेत. त्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नियम डावलून ही प्रभाग रचना तयार करण्यात आल्‍याचा आरोप भाजपकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT