Ganesh Utsav 2023 decoration of Metro 1 station Ganpati mumbai Sakal
मुंबई

Ganesh Utsav 2023: घाटकोपरचे बाप्पा निघाले मेट्रो प्रवासाला; घरगुती गणपतीत साकारला मेट्रो १ स्थानकाचा देखावा

राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपतींसमोरही आकर्षक देखावे साकारले जातात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे, लोकल आणि बेस्ट, मेट्रो हे मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य भाग आहेत. हेच लक्षात घेता घाटकोपरमधील राहुल वारिया या तरुणाने मेट्रोतील बाप्पा हा अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा सध्या सोशलमिडीयावर देखील ट्रेंडींग आहे.

राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपतींसमोरही आकर्षक देखावे साकारले जातात. घरगुती गणपतींची शक्यतो छोट्या आकारातील आणि आपल्या जगण्याशी जोडणारे घटक साकारले जातात. असाच देखावा घाटकोपरमधील राहुल वारिया या तरुणाने साकारला आहे. या देखाव्यातून मेट्रो १ घाटकोपर स्थानकाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. इतकेच नाहीतर मेट्रोतून प्रवास करणारा बाप्पा दाखविण्यात आला आहे.

आम्ही दरवर्षी एका संकल्पनेसह देखावा साकारतो. आम्ही देखाव्यातून शक्यतो रोजच्या जगण्यातील किंवा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असणारे घटक दाखविण्याचा प्रयत्न आमचा असतो. गेल्यावर्षी आम्ही डबल डेक बस, त्यापूर्वी लोकल ट्रेन असे देखावे साकारले होते. यंदाच्या वर्षी आम्ही मेट्रो १ चा देखावा घेऊन आलो आहे.

हा देखावा संपूर्णतः पर्यावरण पूरक आहे. केवळ कागद, पुठ्ठा, स्ट्रॉ आणि डिंक यांचा वापर करून संपूर्ण देखावा उभारला आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती ही मी स्वतः बनविली आहे. यासाठी मौलिक रावळ, राहुल वारिया, निरव व्यास आणि राहुल गुप्ता या मित्रांनी मदत केली, अशी माहिती राहुल वारिया या देखावा साकारणाऱ्या तरुणाने दिली.

सोशलमिडीयावर देखील या अनोख्या देखाव्याला चांगलीच पसंती मिळते आहे. राहुलचा मित्र हितेश काचे या ब्लॉगर मित्राने या देखाव्याची एक क्लिप सोशलमिडीयावर अपलोड केली असता या व्हिडिओला नागरिकांची पसंती दर्शविली आहे. हा देखावा पाहून अनेकांनी राहुलशी संपर्क साधण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचे ब्लॉगर हितेशने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT