मुंबई

Ganesh Utsav 2023: गणेशोत्सवानिमित्त प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित चित्राचा देखावा !

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Utsav 2023: देशभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील राम मंदिराचे 2024 मध्ये शुभारंभ होणार असून याचीच वाट सर्वच भक्तमंडळी पहात आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील सहकार मित्र

मंडळाकडून यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी अनोखा देखावा करण्यात आला आहे... प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आणि रामायण मधील महत्वाच्या घटनाचे चित्रण या देखाव्यात लावण्यात आले आहे. भाविकांना शांत बसून देवाचे चिंतन करता यावे यासाठी छोटेखानी महल तयार करण्यात आला आहे.

प्रभू श्रीरामाचा जन्म, सीता स्वयंवर,14 वर्षे वनवास , सीताहरण , लंकादहन, रामसेतू, रावणवध, श्रीरामाचा राज्यअभिषेक या सर्व घटना दाखविणारे चित्रण याठिकाणी लावण्यात आले आहे. आयोध्यातील राम मंदिर हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान असून ते आज पूर्ण होत आहे. याचमुळे हिंदू म्हणून आपली देखील सदभावना व्यक्त होण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित चित्र देखाव्याच्या स्वरूपात साकारले असल्याचे सहकार मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय विचारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT