Polie Recruitment 
मुंबई

Mumbai Police: पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं! मैदानी चाचणीदरम्यान तरुणाचा मृत्यू

मुंबई पोलिसांच्या भरतीदरम्यान हा प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पोलीस व्हायचं स्वप्न उरी बाळगलेल्या एका तरुणाचा भरती दरम्यान मैदानी चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या भरती कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून याची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. (Ganesh Uttam Ugale collapsed & died during Mumbai police recruitment test)

एएनआयच्या माहितीनुसार, गणेश उत्तम उगले (वय २६) या तरुणाची मुंबईत पोलीस भरतीदरम्यान मैदानी चाचणी होती. यावेळी १६०० मीटर रनिंगदरम्यान गणेशला भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला. त्यानंतर तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

दरम्यान, तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cow Smuggling Crackdown : गो-तस्करांची आता खैर नाही, 'मोक्का' अंतर्गत होणार कारवाई; फडणवीस सरकारचे कडक आदेश

Pune Municipal Corporation: पुणे प्रशासनात खांदेपालट; आयुक्तांकडून निलंबन रद्द करत बदलीचा निर्णय, महापालिकेत मोठी उलथापालथ

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Mumbai Metro: मुंबईकरांची उडाली धांदल, कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत, व्हिडिओ व्हायरल

PM Modi Five Nation Tour : PM मोदी 5 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले; भारतासाठी करून आणली 'एवढ्या' लाख कोटींची गेमचेंजर डील!

SCROLL FOR NEXT