GaneshUtsav2023:  sakal
मुंबई

GaneshUtsav2023: गणेशउत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज; वाचा कसा असेल बंदोबस्त?

Chinmay Jagtap

GaneshUtsav2023: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींसह वाहतूक शाखा, तसेच मुख्यालयातील ६५३ पोलिस कर्मचारी, ५७ अधिकारी, तसेच २५ वॉर्डन बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.



गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने संबंधित सर्व यंत्रणेला तैनात केले आहे

. नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाशी, कळंबोली सर्कल, वेलकम हॉटेल, बांदल वाडीगाव-नवीन पनवेल, गणेश हॉटेल चिंचपाडा-नवीन पनवेल, गव्हाण फाटा वाहतूक शाखा चौकीसमोर पाच ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये वैद्यकीय सुविधा, अग्निशमन दलाचे मदतनीस, वाहन बंद पडल्यास मदतीकरिता मॅकेनिकल टीम, आपत्कालीन काळात संपर्क साधण्याकरिता वायरलेसची यंत्रणा, क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अवजड वाहनांना बंदी
वाहतुकीच्या नियोजन-नियमन करण्यासाठी १ पोलिस उपायुक्त, १ सहाय्यक पोलिस आयुक्त, १२ पोलिस निरीक्षक, ४३ सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक तसेच ६५३ पोलिस अंमलदार आणि २५ वॉर्डन असा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी १६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन क्षमता असलेल्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर विशेष उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून गणेशोत्सव काळात सहकार्य करावे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT