Mumbai Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime News : डोंबिवलीत शुल्लक वादातून टोळक्याची दोन तरुणांना मारहाण

रेल्वे रुळांवरील दगड तसेच बियरच्या बाटल्या डोक्यात फोडून मारहाण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी डोंबिवलीत दोन तरुणांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सातपुल परिसरात घडली आहे. डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून तसेच रेल्वे रुळांवरील दगड फेकून मारत या तरुणांना मारहाण करण्यात आली आहे.

ओमकार माळी व अभिषेक भोईर या जखमी तरुणांवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सचिन म्हात्रे, प्रथम भोईर, महेश चारसे, राम्या म्हात्रे, लाल्या म्हात्रे, सुसते आंबेकर यांसह सात ते आठ जणांविरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे हद्दीत ही घटना घडल्याने हा गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टोळक्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. जखमी अभिषेक याने दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पश्चिमेत मोठागाव परिसरात राहणारा अभिषेक हा भिवंडी पडघा येथील एका खासगी गोडावून मध्ये काम करतो.

मंगळवारी दुपारी तो आपल्या मित्रांसोबत कामावर गेला होता. अभिषेक व ओमकार हे त्यांच्या मित्रांसोबत सायंकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान सातपुल परिसरातून डोंबिवलीकडे येत होते. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध ते आले असता सात पूलाच्या रेल्वे बालकणीवर सचिन म्हात्रे, प्रथम, महेश राम्या, लाल्या, सुसते यासह सात ते आठ इसमांनी या तरुणांच्या जवळ येऊन शिविगाळ करण्यास सुरुवात केली. आम्हास शिवीगाळ का करता ?

असे दोघांनी त्यांना विचारले असता, राम्या व सचिन यांनी आम्हाला ओळखले नाही का ? आम्ही इथले भाई आहोत, येथे तडीपारी करुन बसलो असे सांगितले. यावर दोघांनी आम्हाला काय करायचे आहे तुमच्या गुन्हेगारीशी असे म्हणाले. याचा राग आल्याने त्यांनी रेल्वे ट्रॅकवर पडलेले दगड व त्यांच्या हातातील बियरच्या बाटल्या दोघांना फेकून मारण्यास सुरुवात केली.

त्यावेळी दोघे तरुण घाबरुन सैरावैरा पळू लागले. यातील अभिषेक व ओमकार हे त्या टोळक्याच्या हातात सापडल्याने त्यांनी सर्वांनी हाताच्या ठोश्या बुक्क्यांनी व लाथांनी दोघांना मारले. जवळ असलेल्या बियरच्या बाटल्या दोघांच्या डोक्यात फोडत त्यांना जखमी केले. जबर मारहाण केल्यानंतर टोळक तेथून निघून गेले.

ओमकार व अभिषेक याच्यासोबत असलेल्या मित्रांनी दोघांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अभिषेक याच्या डोक्यास सात ते आठ टाके पडले असून ओमकार याच्या डोक्यात 27 ते 28 टाके पडले आहेत. तसेच त्यांच्या हातापायांनाही मार लागलेला आहे.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात चौदा जणांविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रेल्वे हद्दीत घडली असल्याने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सुरु असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT