मुंबई

धक्कादायक! वापरलेल्या मास्कची होत होती पुनर्विक्री! वसईतील टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

विरार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मास्कची मागणी वाढत असताना पोलिसांनी मंगळवारी वसईमध्ये केलेल्या कारवाईत ’एन 95’ मास्कचा 51 लाख रुपये किमतीचा मोठा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्व मास्क वापरलेले असून ते धुवून पुन्हा विक्रीसाठी आणले जात होते.

विरार पूर्व गडगापाडा परिसरातील एका घरात बोगस ’N 95’ मास्कचे  मोठे रॅकेट सुरु असल्याची माहिती वालीव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून ही कारवाई केली. जप्त केलेल सर्व मास्क धुवून, इस्त्री करून पुन्हा पॅकिंग करून बाजारात  विक्रीसाठी आणले जात होते. हे सर्व मास्क भिवंडी येथून विरारमध्ये  आणले जात होते. हे मोठे रॅकेट असल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी नागराज पिल्ला (33), रोहित कोठरी (30), मोहोम्मद नौशाद शेख (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर कलम 420, 269, 270 सह अत्यावशक वस्तू अधिनियमानुसार 1955 चे कमल 3 (8), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
जप्त केलेले मास्क भिवंडी येथून कुठ्न आणले जात होते आणि वसई, विरारसह मुंबईत ते कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून मास्कसह ते धुण्यासाठी वापरण्यात येणारी वॉशिंग मशीन,  इस्त्री व पॅकिंग करण्याचे साहित्य असे 51 लाख 34 हजार 300 रुपयांचा माल व साहित्य जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Meeting: काय स्वस्त अन् काय महाग होणार? GST परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गाला दिलासा मिळणार की धक्का बसणार?

Parivartini Ekadashi 2025: परिवर्तिनी एकादशीला तुळशीपूजन अन् धूप दानाचे जाणून घ्या महत्त्व

भाजप आमदारानं फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी सुनावणी दुसऱ्या बेंचकडे सोपवली

'या' अभिनेत्रीला 102 कोटी दंड भरण्याची डीआरआयनं बजावली नोटीस; दुबईहून सोन्याची तस्करीप्रकरणी करण्यात आलीये अटक

Sara Tendulkar: 'शुभमन गिलसोबत धोका...'! सारा गोव्याला कोणासोबत गेली होती? सिद्धार्थ केरकर कोण? नेटिझन्सकडून गिलची खिल्ली...

SCROLL FOR NEXT