मुंबई

'गणपती बाप्पा खड्ड्यातूनच या'

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे)- गणपती बाप्पा खड्यातूनच या असी बोलण्याची वेळ यावर्षी गणेश भक्तावर आली आहे. कल्याण- मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर म्हारळ ते कल्याण दरम्यान पडलेले खड्डे न बूजवल्याने गणपती बाप्पाला या पडलेल्या खड्ड्यातूनच गाडी आपटत-आपटत आणावे लागणार असल्याने गणेश भक्तांच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे.

गणपती उत्सव अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असला तरी खड्डे बूजवण्याची कोणतीही तयारी केली नसल्याने गणपतीची खरेदी करण्यासाठी उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणी जाणे डोकेदुखी ठरत आहे. मुरबाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांना खरेदी साठी कल्याण, उल्हानगर या ठिकाणी जावे लागते.

27 किलोमिटरच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गणपती उत्सव जवळ आला असला तरी खड्डे बूजवण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याने आता गणपती बाप्पा तूम्हाला खड्ड्यातूनच यावे लागेल असे बोलण्याची वेळ गणेश भक्तांवर आली आहे. या खंड्यासंदर्भात संबंधित खात्याला फोन केला असता हा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, असेच सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT