ganpati.jpg 
मुंबई

लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मुंबईतील गणेश मंडळांची जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्त्वाची मागणी

दीनानाथ परब

मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मुंबईकर नेहमीच आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहत असतात. यंदा १० ते १९ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अजून काही महिने बाकी असले, तरी मुंबईतील गणेश मंडळांनी यंदाच्यावर्षी तीन ऐवजी चार दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरायला परवानगी द्या, अशी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली आहे.  मुंबईत दीड दिवसाच्या गणपतीचे दुसऱ्यादिवशी त्यानंतर पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी आणि अनंत चर्तुदशीच्या दिवशी गणेश विसर्जन होते. "मंडळांना सामान्यत: गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊड स्पीकर वापरण्याची परवानगी दिली जाते. साधारणत: गौरी विसर्जन सातव्यादिवशी येते. पण यंदाच्यावर्षी गौरी-गणपती विसर्जन पाचव्यादिवशी आहे" असे नरेश दहीबावकर म्हणाले. ते बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. 

यंदा गौरी विसर्जन पाचव्या दिवशी आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊड स्पीकर वापरायला परवानगी दिली. 11,14 आणि 19 सप्टेंबर असे तीन दिवस परवानगी देण्यात आलीय. आम्हाला चौथ्यादिवसाची परवानगी सुद्धा हवी आहे असे दीहबावकर म्हणाले.

दहीबावकर यांनी 2013 सालचे उदहारण दिले. त्यावर्षी गौरी विसर्जन पाचव्यादिवशी आले होते. "आम्ही वर्षातील 12 दिवसांची यादी केलीय, जेव्हा नियमानुसार मध्यरात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाते" असे उपनगरचे जिल्हाधिकारी  मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT