Mumbai Salkal
मुंबई

ठाण्यात दोन दिवसांपासून कचराकोंडी

घंटागाड्या बंद असून सोसायट्यांमध्ये व रस्त्यावर कचरा साचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ऐन नवरात्रोत्सवात शहरातील नौपाडा व उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत घंटागाड्यांतून कचरा उचलणे बंद केल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या वादामुळे या घंटागाड्या बंद असून सोसायट्यांमध्ये व रस्त्यावर कचरा साचला आहे.

त्यामुळे ठाणेकरांना नाहक कचरा कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या नौपाडा व उथळसर प्रभाग समितीतील इमारतीमधील कचरा उचलण्याचे काम घंटागाडी कंत्राटदाराला देण्यात आले आहे; मात्र घंटागाडीच्या ठेकेदाराची मुदत संपली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत नवा करार करण्यात आला नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून घंटागाड्या बंदच असून परिसरातील शेकडो इमारतीमध्ये कचऱ्याचे डवे भरून राहिले आहेत.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

SCROLL FOR NEXT