मुंबई

लालबाग सिलेंडर स्फोट: गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती चिंताजनक

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई इमारतीतील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत 16 जण होरपळून जखमी झालेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील 12 जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान केईएममध्ये उपचार घेणाऱ्या दोघांपैकी सुशीला बागरे (62) या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला तर सोमवारी पहाटेच्या दरम्यान 50 वर्षीय करीम नावाच्या एका व्यक्तीचा देखील दुदैवी मृत्यू झाला. करीम हा कॅटरिंगटचा व्यवसाय करत असून तो साराभाई या इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्याकडे काम करण्यास होता, अशी माहिती मिळतेय. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी 5 जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तिघांना लवकरच डिस्चार्ज

त्यातील तिघांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्या तिघांनाही कमी प्रमाणात भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

5 जणांची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान अचानक झालेल्या या घटनेमध्ये भाजणाऱ्यांचे प्रमाण 60 ते 70 टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे या आता 10 पैकी 5 जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

अशी घडली घटना

लालबागच्या गणेश गल्ली जवळ असणाऱ्या साराभाई या इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या मुलीच्या लग्नाची लगीन घाई सुरू होती, रविवारी हळदी समारंभ होणार होता. मात्र सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लग्न घरातील गॅस सिलेंडरची गळती सुरू होऊन सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एकूण 16 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना केईएम आणि भायखळ्यातील मसीना रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे साराभाई इमारीतीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

दरम्यान, भायखळ्यातील मसीना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींची नावे 

  • प्रथमेश मुणगे (27)
  • रोशन अंधारी (40)
  • मंगेश राणे (61)
  • मंगेश मुणगे (56)
  • ज्ञानदेव सावंत (85)
  • विनायक शिंदे (75)
  • ओम शिंदे (20)
  • यश राणे (19)
  • मिहीर चव्हाण(20)
  • ममता मुनगे(48)

मृत व्यक्तींचे नावे

  • करीम (50)
  • सुशीला बागरे (62)

मसीना रुग्णलयात दाखल

वैशाली हिमांशु (44)
त्रिशा (13)
बिपीन (50)
सूर्यकांत (50)

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Gas cylinder explosion south mumbai lalbaug Update two death

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT