Gastro-Patient
Gastro-Patient 
मुंबई

मुंबईत वाढले गॅस्ट्रोचे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकर गॅस्ट्रोने आजारी पडल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरवड्यात तब्बल 467 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जूनमध्ये 777 मुंबईकरांना गॅस्ट्रो झाला होता. आता हा आकडा 1,244 पर्यंत पोहोचला आहे. मागील 15 दिवसांत 36 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून, राज्यभरातील मृत्यूंची संख्या 191 आहे. दविस्था खान या महिलेचा काही दिवसांपूर्वी परळ येथील केईएम रुग्णालयात मृत्य्‌ृ झाला. ही महिला लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूची संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंब्य्राची रहिवासी असलेल्या दविस्थाने केईएम रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी गोवंडीतील नातेवाइकांची भेट घेतली होती.

ताप आणि श्‍वसनाच्या त्रासामुळे तिला आधी खासगी रुग्णालयात आणि नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे तपास केल्यानंतरच समजेल, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. जूनमध्ये कुर्ल्यात हेपॅटायटिसची साथ पसरली होती. जुलैमध्येही कुर्ल्यात या आजाराचे रुग्ण आढळले. जूनमध्ये 169 आणि जुलैमध्ये 63 रुग्णांची नोंद झाली आहे.

आजार आणि रुग्ण
आजार        जून     जुलै (14 तारखेपर्यंत)    एकूण

डेंगी             8               8                         16
लेप्टो           5              21                         26
मलेरिया      310          146                       456
गॅस्ट्रो         777           467                      1244
हेपॅटायटिस 282           138                       420

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT