Gautam Adani Meets Sharad Pawar esakal
मुंबई

Sharad Pawar : गौतम अदाणी शरद पवारांच्या भेटीला! सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बंद दाराआड चर्चा; राजकीय चर्चेला उधाण

रात्री उशिरा दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.

रोहित कणसे

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे. इतकेच नाही तर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्ष, काँग्रेस पक्षाकडून देखील अदाणी यांच्यावर सतत टीका केली जात आहे. या पार्श्वभूमिवर गौतम अदाणी यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून याबद्दल अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

काही दिवसांपूर्वी धारावी ते वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘अदाणी समूह’ कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात कार्यकर्ते, धारावीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धारावीच्या अदाणींकडून होणाऱ्या पुनर्विकासाला विरोध करत १४ विरोधी पक्ष, सामाजिक संस्था आणि धारावीकरांनी विरोट मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर अदाणी यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT