Chief Minister Eknath Shinde Esakal
मुंबई

Eknath Shinde: गौतमीचा डान्स अन् CM शिंदेंची राजकीय फटकेबाजी, ठाण्यात रंगली अनोखी दिवाळी पहाट

ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील तलाव पाली येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा खास शो ठेवण्यात आला आहे. सोबतच ठाण्याच्या तरुणांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या फिल्मीज म्युसिकल बँडची देखील मेजवानी ठाणेकरांसाठी ठेवण्यात आली होती.

ठाण्यातील कार्यक्रमावेळी काय म्हणाली गौतमी

मी नेहमी मुंबईत येत असते, मुंबईकर मला नेहमी भरभरून प्रेम देतात. मी पहिल्यांदाच ठाण्यात आली आहे. ठाणेकरांचा उत्साह एक नंबर आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा...आज लक्ष्मीपूजन आहे, सर्वांच्या घरी लक्ष्मी येवो, ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो असं गौतमी माध्यमांशी बोलताना म्हणाली.

एकनाथ शिंदेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुखी समृद्धी आनंदाची जावो म्हणत शिंदेंनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणेकरांचा जल्लोष ओसंडून वाहतोय. गेल्यावर्षा पण जोर होता. त्यापूर्वी बंद होतं. आपलं सरकार आल्यापासून सगळी बंधनं काढली. दसरा दिवाळी सगळं साजरं करतोय. आपले सण उत्सव ही परंपरा वाढवायला हवी. ते काम ही तरुणाई करते, धर्मवीर आनंद दिघेंचा हा बालेकिल्ला आहे. सर्वांनी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करुया आणि संस्कृती कायम ठेवूया असंही पुढे शिंदे म्हणालेत.

दिवाळीच्या आदल्या दिवशी येऊन असं विघ्न आणणं चुकीचं - CM शिंदे

दिवाळीच्या आदल्या दिवशी येऊन अस विघ्न आणणं चुकीचं आहे. दिवाळीच्या आधी त्यांचा फुसका बार निघाला. आमचे नरेश म्हस्केसारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, आमच्या फटक्यांनी त्यांना परत जावं लागलं. काल ते बरंच काही बोलून गेले, आज मी काही बोलणार नाही, अशी खोचक टीका शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT