MUMBAI
MUMBAI 
मुंबई

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेल्वेत सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

अनिश पाटील

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर उभ्या असलेल्या शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडली आहेत. या कथित स्फोटकांसोबत पत्र व एका व्यक्तीचे छायाचित्रही सापडले आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे. पत्रामध्ये बीजेपी सरकारचाही उल्लेख करण्यात आला आहे.

शालीमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. त्याच्यासोबतच्या पत्रात फोटोकॉपी काढलेल्या एका व्यक्तीचे छायाचित्र सापडले आहे. त्यात काही मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे. याशिवाय बीजेपी सरकारचा उल्लेख करण्यात आला असून चार संशयीत व्यक्ती असल्याचे म्हणणण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ववैनस्यातून या व्यक्तींना अडकवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, स्फोटक सर्दुश्य वस्तू निकामी करण्यात आली असून पुढील चाचणीसाठी न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. प्राथमिक चाचणीत जीलेटीनसदृश्य फटाके वापरण्यात आल्याचा दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लोकमान्य टिकळ टर्मिनस हे मुंबईतील अतिशय महत्त्वाचं स्थानक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस या स्थानकावरुनच सुटतात. ही स्फोटकं एक्सप्रेसमध्ये कोणी ठेवली. ती कुठून आली याबाबत पोलिसांचा शोध सुरु आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT