मुंबई

तयार राहा...!!! लॉकडाउनच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर मुंबई किंवा तत्सम मोठ्या शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभरात सध्या रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. पण असे असले तरी दिवसा अनेक नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत असताना आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत. धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले असून राज्याला एका अर्थाने 'तयार राहा...' असा इशारा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना लॉक़डाउनच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. जर कोरोनाला रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अशाचप्रकारे उल्लंघन होत राहिले तर राज्यात लॉकडाउन सदृश निर्बंध लादावेत लागतील असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक योग्य पद्धतीने करत असल्यामुळे ही परिस्थीती ओढवली आहे. त्यामुळेच राज्याची पुन्हा एकदा लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल होत असून त्यासदृश नियम लादण्याची गरज निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एकीकडे आपण कोविड परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरु राहील याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. पण अनेक लोक अजूनही कोरोना ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खाजगी कार्यालयांतून उपस्थिती नियमांचे पालन केले जात नाही. विवाह समारंभात घालून दिलेल्या नियमांची थेट पायमल्ली सुरू आहे. बाजारपेठांमध्येही काहीशी तशीच परिस्थिती आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुणे आणि मास्कचा वापर करणे या प्राधान्यक्रमाने करण्याच्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या जात नाहीत. त्यामुळे अखेर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यालाच विचार करावा लागणार आहे. आता नागरिकांनी अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे नाहीतर लॉकडाऊन करावं लागेल, असे समजून 'तयार राहा' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT