water supply esakal
मुंबई

Water Supply : घाटकोपर परिसरातील काही भागात पाणी पुरवठा वेळांमध्ये बदल

मुंबई महानगरपालिकेने 'एन' विभागातील घाटकोपर जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने 'एन' विभागातील घाटकोपर जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्‍यामुळे एका कप्‍प्‍यातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्‍यासाठी काही भागांच्‍या पाणीपुरवठ्याच्‍या वेळांमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

घाटकोपर जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ चे दुरूस्तीचे काम २४ ऑगस्‍ट पासून सुरू झाले आहे. जलाशयाच्‍या दोन्ही कप्प्यांचे काम हे २० महिने (पावसाळा वगळता) सुरू राहणार आहे. सदर कालावधीमध्‍ये पाणीपुरवठा एका कप्प्यातून केला जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयाच्‍या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

१) पाणीपुरवठा झोन – नारायण नगर

- आधीची पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५

- पाणीपुरवठ्याची नवीन वेळ - दुपारी २.३० ते सायंकाळी ५ व रात्री १०.४५ ते रात्री ११.३०

विभागांचे नाव -

चिराग नगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल इस्टेट, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एम. पथ, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नौरोजी पथ, एच. आर. देसाई मार्ग, कामा पथ, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी.

२) पाणीपुरवठा झोन - पंत नगर आउटलेट

आधीची पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.००

पाणीपुरवठ्याची नवीन वेळ - सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३०

विभागांचे नाव -

भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रँच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, धृवराजसिंग मार्ग, सी. जी. एस. कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्ग, घाटकोपर, पश्चिम लगतचा परिसर, श्रेयस सिग्नल आदी

३) पाणीपुरवठा झोन - सर्वोदय बुस्टींग

आधीची पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५

पाणीपुरवठ्याची नवीन वेळ - सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५

विभागांचे नाव -

सेनिटोरीयम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, एल. बी. एस. मार्ग लगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT