Gujrathi board sakal
मुंबई

Mumbai News : घाटकोपरमध्ये गुजराती पाटयांचा वाद चिघळला

घाटकोपरमध्ये गुजराती पाटयांचा वाद चिघळला आहे. ठाकरे गट आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून चढाओढ सुरू.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - घाटकोपरमध्ये गुजराती पाटयांचा वाद चिघळला आहे. ठाकरे गट आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून चढाओढ सुरू आहे. आठ वर्षांपूर्वी लावलेल्या गुजराती फलकाचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. आज भाजपाने गुजराती नामफलक तोडल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली.

घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी गुजराती भाषेत असलेल्या 'मारू गुजराती' ही पाटी तोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज घाटकोपर पूर्व येथील आर. बी. मेहता मार्गावरील गुजराती नामफलक तोडण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाने ही तोडफोड केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तोडफोडीविरोधात भाजप आक्रमक झाली असून गुजराती पाटी पाटी असूच नये असा नियम आहे का, असा सवाल भाजपाने केला आहे.

ठाकरे गटाने हा नामफलक फोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप आमदार पराग शहा, माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आर. बी. मेहता मार्गाची पाटी तोडण्यात आली तिथे निदर्शने करण्यात आली.

भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी म्हटले की, 2016 मध्ये मी नगरसेवक असताना हवेली पूल जवळ सदर चौक बांधला होता. या चौकाच्या एका बाजूला मराठीत "माझे घाटकोपर" दुसऱ्या बाजूला इंग्रजीत माय घाटकोपर आणि तिसऱ्या बाजूला गुजरातीमध्ये 'मारू घाटकोपर' आणि चौकाच्या मध्यभागी मराठी मध्ये आपले स्वागत आहे असे लिहिले होते.

संपूर्ण परिसर माझ्या नगरसेवक निधीतून सुशोभीत करण्याला आले. त्याला आठ वर्ष झाली. आजपर्यंत एक ही तक्रार कोणीही केली नाही. शिवसैनिकांनी शनिवारी रात्री तोडले. ठाकरे गट आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून चढाओढ सुरू आहे. त्याच्या परिणामी अशा घटना घडत आहेत. गुजराती सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे गुजराती पाट्यांची तोडफोड सुरू असल्याचा आरोप छेडा यांनी केला.

मनसे मनसेने टोल बंद आंदोलन केले आहे. त्यांनी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती पाट्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे समजते. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT