water sakal
मुंबई

घोडबंदरवासीयांना मुबलक पाणी मिळणार

कासारवडवलीत १२ लाख लिटर क्षमतेच्या दोन्ही जलकुंभांचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील रहिवाशांची आता पाणी समस्या सुटणार आहे. प्रतिदिन १२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेले दोन जलकुंभ कासारवडवली येथे उभारण्यात आले असून, बुधवारी त्याचे लोकार्पण झाले. त्यामुळे घोडबंदरवासीयांना अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे अंतर्गत रिमॉडेलिंगचे काम सुरू आहे. पालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यातून वाढीव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध उपाययोजनांची कामे मंजूर करून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत घोडबंदर रोड परिसरात नव्याने दोन जलकुंभ व पंप देखील उभारण्यात यावेत, यासाठी नगरसेवक नरेश मणेरा यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.

त्याला अखेर यश आले आहे. पालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस व जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभापती संजय भोईर, भूषण भोईर, नगरसेवक साधना जोशी, नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, दिलीप ओवळेकर, रवी घरत, मुकेश ठोंबरे, नितीन लांडगे उपस्थित होते.

८० हजार रहिवाशांची तहान भागणार

कासारवडवली येथील दोन्ही जलकुंभांमुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्पिटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन आदी विभागांतील ८० हजार नागरिकांची तहान भागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: वेतन आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेचच पगार वाढणार का? सरकार काय घेऊ शकते निर्णय?

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

पॅन्ट काढली अन् गुप्तांगात..., पूर्णेकर समर्थकांना पोलिसांची थर्ड डिग्री; अमानुष मारहाण करत अपमानास्पद कृत्य करायला लावलं

Marathi News Live Updates : रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा रविवारी लोकशाहीसाठी मोर्चा

Mangalwedha News: उजनीचे पाणी मंगळवेढ्यात पोहोचण्याआधीच नदीकाठचा वीजपुरवठा दोन तासांवर; शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT