मुंबईः कल्याणमधील नवीन पत्रीपुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम रविवारी तांत्रिक कारणास्तव 10 टक्के काम राहिले होते. मात्र ते काम मध्यरात्रीच विशेष मेगाब्लॉक घेत पूर्ण केले आहे. काम पूर्ण होताच सर्वांनी सुटेकचा मोकळा श्वास घेत आनंद व्यक्त केला. यावेळी सर्व अधिकाऱ्यांसह स्वतः खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही हजेरी लावली होती.
कल्याणमधील नवीन पत्रीपूल 76 .76 लांबी आणि 730 मेट्रिक टन वजनाच्या लॉचिंग करण्यासाठी मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी (21 आणि 22 नोव्हेंबर) विशेष मेगाब्लॉक देण्यात आला होता. 8 तासांच्या या मेगाब्लॉकमध्ये गर्डर दोन खांबांवर बसविण्याचे तर त्यानंतरच्या शनिवार रविवारी या गर्डरचे फिक्सेशन करत त्यावर प्लेट, कॉंक्रीट टाकण्याचे काम केले जाणार होते. यासाठी पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मेगाब्लॉक दरम्यान गर्डर लॉचिंग काम शनिवारी सुरुवात झाली. त्यानंतर 22 नोव्हेंबरला दादरमध्ये उद्यान एक्सप्रेसचे इंजिन बिघाड झाल्याने मेगाब्लॉक उशिरा सुरू झाले. साडे दहा वाजता गर्डर लॉचिंग करण्यास सुरुवात झाली.
दुपारी मात्र गर्डर लिंचवायरवरून पुश थ्रू होताना आजूबाजूला सरकत असल्याने तो पुन्हा मूळ स्थानावर आणत ढकलण्यात टप्याटप्प्यावर अडचणी येत होत्या. हे काम सुरू असताना मेगाब्लॉक संपला आणि लोकल सेवा सुरू झाल्याने काम थांबविण्यात आले. 90 टक्के काम झाले आणि 10 टक्के काम राहिल्याने आणखी मेगाब्लॉकची गरज होती. त्यामुळे मेगाब्लॉक द्या अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याकडे केली.
श्रीकांत शिंदे यांनी ही मागणी केल्यावर उर्वरित कामाला मध्यरात्री दीड ते तीन या काळात विशेष मेगाब्लॉक देण्यात आला. त्यानंतर गर्डर लॉचिंग कामाला सुरुवात झाली. प्रत्येक फुटाला तपासणी करत गर्डर पुढे ढकलण्याचे काम सुरू होते. विशेष मेगाब्लॉक काळ संपला तरी खाली मेल गाड्या जात असताना वरती गर्डरवर काम सुरू होते. पावणे दोनच्या सुमारास सुरू झालेले काम पहाटे सहा वाजून पाच मिनिटाला पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास सोडला आणि आणि आनंद ही व्यक्त केला. यावेळी रेल्वे, रस्ते विकास महामंडळ, राईट्स , ठेकेदारांचे अधिकारी, वाहतूक पोलिस, शहरी पोलिस आदी उपस्थित होते तर यावेळी पूर्ण वेळ खासदार डॉ श्रीकांत शिंदे ही उपस्थित होते.
सर्वांच्या एक संघ आणि दृढ निश्चियामुळे काम यशस्वी - शिंदे
गर्डर लॉचिंग करताना दिवस भर अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या एक संघ आणि दृढ निश्चियामुळे गर्डर लॉचिंग काम पूर्ण झाल्याचे मत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. तर पुढील कामांना वेग द्या अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
The girder launching work kalyan patripool finally completed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.