Beating esakal
मुंबई

Kalyan Crime : कल्याणमध्ये तरुणीला टोळक्याची बेदम मारहाण

गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीला एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीला एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणी अंजली ठाकूर हिने मानपाडा पोलीस ठाण्यात 6 ते 7 जनांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेतील आडिवली भागात अंजली राहण्यास आहे. सोमवारी रात्री अंजली नातेवाईकांसोबत नांदीवली तलाव येथे गणपती विसर्जनासाठी जात होती. रात्री 11.30 च्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरून सैफ अली खान, राम तिवारी, स्काय गुलाम, सत्यम, भावेश आणि विशाल आणि त्यांच्या साथीदारांनी अंजलीला रस्त्यात अडवले. तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अंजलीचे नातेवाईक तिच्या बचावासाठी पुढे आले तर टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. टोळक्यातील एका तरुणाने जवळील चाकूने अंजलीला दुखापत केली.

मारहाणीनंतर सात ते आठ तरुण घटनास्थळावरून पळून गेले. अंजलीने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. ढेंबरे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT