Pune Crime Murder Shot Dead Criminal lonikand 
मुंबई

Navi Mumbai Murder: उरण पाठोपाठ सीवूडमध्ये प्रेयसीची हत्या, प्रियकरानेही संपवले जीवन

Latest Crime News: शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Seawood Murder: उरण येथील 20 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी सीवूडसमध्ये आणखी एका 19 वर्षीय तरुणीची डीपीएस लगतच्या तलावात हत्या करून टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

भाविका मोरे (20) असे या तरुणीचे नाव असून तिचे पनवेल येथील स्वस्तिक पाटील (22) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे व त्यानेच भविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तेथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

बुधवारी सायंकाळी सिवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरे हिचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी भविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता भावीका आणि तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील हे दोघेही दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून सिवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावाच्या दिशेने जाताना निदर्शनास आले. परंतु स्वस्तिक पाटील परत येताना निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्याने भाविकाची हत्या केल्यानंतर त्याने येथील तलावात उडी मारल्याचा संशय आहे. सदर तलाव खाडीला लागून असल्यामुळे त्याचा मृतदेह खाडीत वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता स्वस्तिक पाटील याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भाविका मोरे हिचा स्वस्तिक पाटील याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही बुधवारी सायंकाळी सीवूडस येथील डी पी एस तलावालगत आल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

मात्र आता दोघेही नसल्याने त्यांच्यात नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले, हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. एन आर आय पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत या प्रकरणा चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, या घटनेतील मृत भाविका मोरे ही नेरुळ मध्ये राहण्यास होती, तसेच सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. भाविकाच्या वडिलांचे निधन झाल्याने सध्या ती आई व बहिणीसह राहत होती. तर स्वस्तिक पाटील हा पनवेलमध्ये राहण्यास होता, तसेच तो एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT