मुंबई

कथोरे यांना मंत्रिमंडळात घ्या; मुरबाडच्या नागरिकांची मागणी

मुरलीधर दळवी

मुरबाड (ठाणे) : महाराष्ट्रातून निवडून आलेल्या भाजप आमदारांमध्ये प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळविणाऱ्या व सर्व 288 आमदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून निवडून आलेल्या मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी मुरबाड मतदारसंघात होत आहे.

माजी महसूलमंत्री कै. शांताराम घोलप यांच्यानंतर मुरबाड मतदारसंघात कोणालाही मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी तरी कथोरे यांना मंत्री करून लोकांची मागणी पूर्ण करावी, यासाठी खासदार कपिल पाटीलसुद्धा कथोरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

किसन कथोरे सलग चौथ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. गावच्या सरपंच पदापासून जिल्हापरिषद अध्यक्ष ते आमदार असा सर्व पदांचा अनुभव, राज्यातील मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणणारे मुरबाडचे आमदार कथोरे यांची कामगिरी पाहता त्यांचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा, अशी मागणी लोक करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून

Mumbai News: ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत! मुंबईत नवा उड्डाणपूल खुलणार, कुठे आणि कधीपासून?

हिंदी मालिकेत रोमान्सच्या नावाखाली मारहाण; प्रेक्षक संतापले; मराठीत बनलाय त्याच मालिकेचा रिमेक, इथेही तेच दाखवणार?

Bandhavgad Tiger: वाघ पाहायचाय? मग बांधवगडला नक्की जा! २००० वर्षांचा किल्ला, जंगल सफारी आणि आता राष्ट्रीय पुरस्काराचीही शान

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT