मुंबई

राजभवनात हिंदूंनाही उपासनेसाठी जागा द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबादेवी : राजभवनातील मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी नमाज पठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना पार्श्‍वभूमीवर नमाजसाठी राजभवनातील मशीद खुली करावी, अशी मागणी "रझा अकादमी' संघटनेने पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे. यावर राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे. 

समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी याबाबत माहिती दिली आहे. हिंदु जनागृती समितीने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यघटनेप्रमाणे भारतीय शासन आणि प्रशासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभावाचे पालन करणारी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला झुकते माप देता येत नाही. राज्यघटनेत न्याय, बंधूता, समता... आदी मूलभूत तत्त्वाचे पालन बंधनकारक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे राजभवनात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एका मशीदीसाठी जागा देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर आणि नियमानुसार हिंदू कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी.

जेणेकरून राजभवनातील हिंदू कर्मचारी आणि बाहेरील हिंदू महाआरती, पूजा, उपासना, तसेच विविध धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतील. तसेच त्या जागेत जाऊन त्यांना नित्य उपासना करता येईल, असेही घनवट यांनी म्हटले आहे. 

Give space for worship to Hindus in Raj Bhavan too Demand of Hindu Janajagruti Samiti

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT