bakri eid
bakri eid  
मुंबई

बकरी ईदच्या कुर्बानीची सरकारने परवानगी द्यावी; नसीम खान यांची मागणी..

कृष्ण जोशी

मुंबई: बकरी इद या मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या सणाच्या दिवशी राज्यात कुर्बानी देण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांनी केली आहे. 
    
बकरी इद चा सण एक ऑगस्ट रोजी येत असून हा सण कसा साजरा करावा, यासंदर्भात सरकारने अद्याप काहीही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील मुस्लिम भाविक आणि संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जशी सरकारने गणेशोत्सवाला सशर्त संमती दिली आहे, तशाच प्रकारे अटींसह कुर्बानीला संमती द्यावी व त्याची व्यवस्थाही करावी. 

यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या सणाच्या दिवशी कुर्बानी अनिवार्य असते, दरवर्षी हा सण मुस्लिम समाज आनंदाने साजरा करतो.

यंदा कोरोनाच्या फैलावामुळे सर्वधर्मियांचे अनेक सण-उत्सव साजरे झाले नाहीत. मात्र गणेशोत्सवाप्रमाणेच काही अटींवर कुर्बानीसाठी संमती द्यावी, बकरे विक्रीची व कत्तलीची व्यवस्था अन्य ठिकाणी करून त्याची परवानगीही द्यावी. ज्यायोगे मुस्लिम बांधवांना हा सण आनंदाने साजरा करता येईल, असेही खान यांनी या पत्रात म्हटले आहे. 

कोकणातील गणेशोत्सवाचे काय:

दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसंदर्भात सरकारने सुयोग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही नसीम खान यांनी यापूर्वीच केली होती. मात्र त्यासंदर्भात शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात लोकप्रतिनिधी व अधिकारी उलटलुसट विधाने करीत आहेत. मुंबईहून येणाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागेल का, त्यांना किती दिवस आधी कोकणात यावे लागेल, आदींबाबत त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. 

भाविकांनी कोकणात जावे का, त्यासाठी सरकार एसटी, रेल्वेला परवानगी देणार की भाविकांनी खासगी गाड्यांमधून जावे, या मुद्यांबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी खान यांनी केली होती. यासंदर्भात आता संबंधित विभागाला बैठक घेऊन त्वरेने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी आपण केली आहे, असेही त्यांनी सकाळ ला सांगितले.

संपादन : अथर्व महांकाळ 

giver permission for bakri eid celebration seek nasim khan 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT