मुंबई

ग्लोबल आयोडीन प्रतिबंध विकार दिवस! जगभरात 1.5 अब्जाहून अधिक लोक आयडीडीने ग्रस्त 

भाग्यश्री भुवड


मुंबई : आयडीडीएस ही जगातील एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. जगभरात 1.5 अब्जाहून अधिक लोक आयडीडीशी असुरक्षित आहेत. आपल्या देशात असा अंदाज आहे की दोनशे दशलक्षांहून अधिक लोकांना आयडीडीचा धोका आहे आणि सत्तर दशलक्ष लोक गॉइटर आणि इतर आयडीडीएसने ग्रस्त आहेत. तथापि, हे सर्व विकार होण्याआधी सहजपणे रोखता येऊ शकतात. आयडीडीचा व्यापक विस्तार रोखण्याचा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे आयोडीनयुक्त मीठ दररोज सेवन करणे. 

दर वर्षी 21 ऑक्टोबर रोजी जागतिक आयोडीन कमतरता दिन पाळला जातो. आपल्या दैनंदिन आहारात ज्यांचा समावेश असलाच पाहिजे अशा पोषक घटकांपैकी एक आयोडीनचे महत्त्व काय आणि किती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.  प्रत्येक मुलाच्या शारीरिक वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक घटक गरजेचे असतात. लहान बाळे आणि वाढत्या वयातील मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पोषणाचा, खास करून आयोडीनचा अभाव ही संपूर्ण जगभरातील एक मोठी समस्या बनली आहे.  मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी हे पोषक घटक महत्त्वाचे असतात.  वयाच्या सुरुवातीच्या काळात शरीराला मिळणारे पोषण हे संपूर्ण आयुष्यभरासाठी मेंदूच्या विकासाला प्रभावित करत असते.

5 वर्षे वयापर्यंत मुलांच्या निरोगी मानसिक विकासासाठी ठराविक प्रमाणात आयोडीन मिळत राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबरीने त्यांना त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळत राहील याची देखील काळजी घेतली पाहिजे.  युनिसेफच्या एका अहवालानुसार 2 मानवी जीवनामध्ये पहिल्या 1000 दिवसात किंवा गर्भधारणा झाल्यापासून वयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत आरोग्य, वाढ, मेंदू आणि मज्जासंस्थेचा विकास यांची पायाभरणी केली जाते.

टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या न्यूट्रिशन एक्स्पर्ट कविता देवगण यांनी सांगितले, "समुद्रातील मासे, अंडी आणि दुग्ध उत्पादनांमध्ये आयोडीन असते.  परंतु दररोजच्या स्वयंपाकात वापरले जाणारे आयोडीनयुक्त मीठ हे शरीराला दररोज आणि योग्य प्रमाणात आयोडीन पुरवण्यासाठी अतिशय योग्य ठरते आणि त्याचे सेवन सर्व व्यक्ती करू शकतात.  दररोज पुरेशा प्रमाणात आयोडीनचे सेवन केल्याने मुलांचा मानसिक विकास योग्यप्रकारे होत राहतो आणि मुले चलाख, चपळ व हुशार बनतात.  खाण्याच्या बाबतीत मुले फारच चोखंदळ असतील किंवा मुलांना काही पदार्थांची ऍलर्जी असेल तरी आयोडीनयुक्त मिठामार्फत त्यांच्या दैनंदिन जेवणामध्ये आयोडीनचा समावेश सहजसोप्या पद्धतीने करता येतो."   

आयोडीन, लोह, फॉलीक ऍसिड, अ जीवनसत्व, झिंक यासारख्या सूक्ष्म पोषकघटकांची कमतरता "हिडन हंगर" अर्थात दडलेल्या भुकेला कारणीभूत ठरते. ही समस्या संपूर्ण जगभरात आढळून येत असली तरी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये ती प्रकर्षाने जाणवते.आज बहुतांश देशांमध्ये आयोडीन कमतरतेचा धोका आहे कारण हे खनिज जमीन आणि वातावरणात असमान पद्धतीने विभागले गेले आहे. अनेक भागांमध्ये जमिनीतील आयोडीनचे प्रमाण झपाट्याने घटत आहे, परिणामी त्या जमिनीतून उगवल्या जाणाऱ्या अन्नधान्यामध्ये देखील आयोडीनची कमतरता असते.

आपल्याला किती आयोडीन आवश्यक असते?

एका व्यक्तीला आपल्या जीवनभरासाठी एक चमचा इतके आयोडीन आवश्यक असते. पण, आयोडीन शरीरामध्ये दीर्घकाळपर्यंत साठवून ठेवले जाऊ शकत नाही, त्यामुळे शरीराला दररोज अगदी थोड्या प्रमाणात आयोडीन मिळत राहिले पाहिजे. अनेक आंतरराष्ट्रीय समूहांनी या संदर्भात सूचना केलेल्या आहेत, ज्या बऱ्यापैकी एकसमान आहेत. 

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या माहितीनुसार, 

वयोगट 0 ते 5 वर्षे: दररोज 90 मायक्रोग्रॅम्स (एमसीजी)

वयोगट 6 ते 12 वर्षे: 120 एमसीजी

12 वर्षापेक्षा जास्त: 150 एमसीजी

गर्भवती महिला व स्तनपान करवणाऱ्या माता: 250 एमसीजी 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT