मुंबई

कल्याणवरून शीळ खिंडीत जा विना अडथळा

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-शिळ-महापे मार्गावर टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या पाहणीदरम्यान हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. हे काम पूर्ण झाल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

कल्याण फाटा आणि शिळफाटा येथील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीतून त्वरित काही दिलासा मिळावा यासाठीही छोट्या-छोट्या सूचना करण्यात आल्या होत्या. वाहतूक विभागाने या सूचनांवरही काम करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरातील रस्त्यांवर बॅरीगेटिंग टाकण्यात येत आहेत. टेकडीवरील रस्त्याच्या दुरुस्तीनिमित्त 14 ते 17 डिसेंबरदरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. 

या रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे प्रवाशांना विलंब होत असे. मात्र आता हा प्रवास जलद गतीने होत असल्याचे प्रवाशांनी समाज माध्यमांवर स्पष्ट केले आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये आमदार पाटील यांनी उड्डाणपूल उभारणे, अंडरपास तयार करणे अशा सूचना केल्या आहेत. पाटील यांनी यासंदर्भात प्राधिकरणाशी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT