Crime Sakal
मुंबई

Navi Mumbai : गोवा येथे वृद्धाची हत्या करुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोडप्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

नंबरप्लेट नसलेल्या फॉर्च्युनर कारमुळे आरोपी सापडले पोलिसांच्या जाळ्यात.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - गोव्यामध्ये एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करुन त्याच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन तसेच त्याची महागडी फॉरच्युनर कार घेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटापैकी 22 वर्षीय तरुणीसह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडुन फार्च्युनर कार व इतर ऐवज हस्तगत केला आहे. या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये जितेंद्र साहु (32) व त्याची 22 वर्षीय मैत्रिण या दोघांचा समावेश आहे. तसेच पळून गेलेल्या त्यांच्या साथिदाराचे नाव कुणाल असे आहे. हे तिघेही मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये राहण्यास आहेत. तर त्यांनी हत्या केलेल्या वृद्धाचे नाव निम्स बादल असे असून तो गोवा येथे राहण्यास आहे.

निम्स बादल याने जितेंद्र व त्याच्या मैत्रिणीला त्याच्या गोवा येथील व्हिलामध्ये राहण्यासाठी बोलाविले होते. त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी जितेंद्र, त्याची मैत्रिण व त्यांचा मित्र कुणाल हे तिघेही भोपाळ येथून गोवा येथे गेले होते.

या तिघांना व्हिलामध्ये घेऊन जाण्यासाठी निम्स बादल याने त्याची फॉरच्युनर कार पाठवली होती. मात्र सदर व्हिलामध्ये असताना रात्रीच्या सुमारास निम्स बादल याने जितेंद्रच्या मैत्रिणीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जितेंद्र, कुणाल आणि त्यांची मैत्रिण या तिघांनी निम्स बादल याची तोंडावर उशी दाबुन त्याची हत्या केली.

त्यानंतर त्यांनी निम्स बादल याची फॉरर्च्युनर कार, अंगावरील दागिने व मोबाईल फोन घेवून पळ काढला होता. मात्र कुणाल तेथूनच फरार झाला होता. या फॉर्च्युनर कारचा कुणाला संशय येऊ नये यासाठी जितेंद्रने त्याच्यावरील नंबर फ्लेट काढली होती.

मात्र सदर फॉर्च्युनर कारवर नंबरफ्लेट नसल्यामुळे सदरची कार गोवा येथून चोरुन मुबंईच्या दिशने घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते व त्यांच्या पथकाने पाली पोलिस स्टेशनच्या मदतीने सदर फॉरच्युनर कारसह जितेंद्र व त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांची चौकशी केली असता, त्यांनी निम्स बादल याच्या हत्येची व गोवा येथे घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली.

त्यानुसार गुन्हे शाखेने गोवा पोलीसांशी संपर्क साधून त्याबाबत खातरजमा केली असता, गोव्यातील पोरवोरीम पोलीस ठाण्याच्या हददीत निम्स बादल या वृद्धचा संशयास्पद म्यू झाला असल्याचे पोरवोरीम पोलिस स्टेशन येथे हत्या व जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.

आबासाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-1) -

या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी व तिच्या साथिदाराने गोवा येथे निम्स बादल याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याबाबतची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आली असून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT