मुंबई

मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी आनंदाची बातमी; किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर मासेमारांनाही मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

संदीप पंडित

विरार ः शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर देशातील सर्व मासेमारी करणाऱ्या बोटधारकांना त्यांच्या बोटीच्या मूल्यानुसार आता कर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. हे कर्ज 2 ते 5 लाखांपर्यंत असून 5 वर्षांकरिता मिळणार आहे. या योजनेमुळे अखिल महाराष्ट्र कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नर्ड डिमेलो यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. उत्तनच्या पाली मच्छीमार संघाच्या माध्यमातून पहिल्या मच्छीमाराला कर्ज मंजूर झाल्याने कर्ज मिळवून देणारी राज्यातील पहिली संस्था ठरली आहे; तर या योजनेत असलेल्या त्रुटी शासनाने दूर कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे.

मच्छीमारांना कर्जाच्या रकमेतून गरजेनुसार बॅंक खात्यातील रक्कम काढता येणार आहे. या योजनेद्वारे मच्छीमारांना 7 टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होईल. तरी लाभार्थी मच्छीमार मंजूर कर्जातील जेवढी रक्कम काढतील त्या रकमेवरच व्याज आकारले जाणार आहे. काढलेल्या रकमेची परतफेड एका वर्षात करावी लागणार आहे. कर्जाची परतफेड नियमित केल्यास व्याजात 2 टक्‍क्‍यांची सवलत मिळणार असल्याने प्रत्यक्षात कर्जावर 5 टक्केच व्याज आकारले जाणार आहे. तसेच कर्ज मिळविण्यासाठी कर्जदाराला काहीही तारण ठेवण्याची गरज नाही व जामीनदारांची गरज नाही. ज्या मच्छीमाराच्या नावावर बोट आहे त्याला मच्छीमार संस्थेच्या शिफारस पत्रासह आवश्‍यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. हा प्रस्ताव परिसरातील बॅंकेत कर्ज मंजुरीसाठी सादर करावा लागणार असल्याची माहिती बर्नर्ड यांनी दिली. 


केंद्राची ही योजना चांगली आहे; परंतु यात काही त्रुटीही आहेत. एक म्हणजे मच्छीमार आणि बॅंक यांच्यामध्ये मध्यस्थी असलेल्या सोसायट्यांना बॅंक कर्जाची जबाबदारी घेण्यास सांगत आहे. मुळात बॅंक एखाद्याला कर्ज देणार आहे त्याच्या कर्जाशी सोसायटीचा काहीही संबंध नसताना सोसायटी कशी काय जबाबदारी घेणार. ही अट सरकारने त्वरित दूर करावी. 
- संजय कोळी,
वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था, पाचुबंदर वसई. 

या योजनेपूर्वी मच्छीमार मासळी व्यापारी, तसेच सावकाराकडून कर्ज घेत होता. त्यातच कर्जावरील व्याज अवाच्या सव्वा असल्याने यात मच्छीमारांची फसवणूक होत असल्याने या योजनेमुळे मच्छीमारांची आर्थिक पिळवणूक थांबणार असून त्यांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. 


- बर्नर्ड डिमेलो,
कार्याध्यक्ष,
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती. 

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT