मुंबई

खारघरकरांसाठी आनंदाची बातमी! नागरी आरोग्य केंद्रात कोरोना अँटीजन चाचणी सुरू

गजानन चव्हाण - सकाळ वृत्तसेवा


खारघर: कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने  खारघर मधील नागरी आरोग्य केंद्रात  अँटीजेन टेस्ट चाचणी सुरू केली आहे.तीस मिनिटात रुग्णास चाचणीचा अहवाल प्राप्त होत असल्यामुळे समाधान व्यक्त करीत आहे.

नशीब रुतले चिखलात! पिकत्या भातशेतीवर उगवले कांदळवन; लॉकडाऊनमुळे रोजचं पोट भरणं कठीण
  
 खारघर आणि  तळोजा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. गेल्या तीन महिन्यात खारघर मध्ये 976 तर तळोजा परिसरात 281 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यात खारघर मध्ये 654 तर तळोजा मधील 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन्ही नोड मध्ये 21 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे आणि कोरोनाच्या चाचणीसाठी खारघरच्या बाहेर जावे लागत असल्यामुळे  पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निदर्शनास येताच 20 जुलै पासून पालिकेच्या खारघर सेक्टर बारा मध्ये असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात  तपासणी साठी येणाऱ्या रुग्णास कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे तपासणी साठी  अँटीजन टेस्ट किटचा उपयोग केला जात असल्यामुळे आणि वेळेत अहवाल प्राप्त होत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.

 खारघर मध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिकेच्या ध्यमातून अँटीजेन  टेस्ट च्या माध्यमातून  30 मिनिटात रुग्णाचा अहवाल प्राप्त होतो.मंगळवार ता.21 रोजी 10 रुग्णाची तपासणी करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत रुग्णाची तपासणी केली जात आहे.कोरोनाची लागण झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठविले जाते.-
डॉ.पंकज टीटार वैधकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र खारघर पनवेल पालिका.

 कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण खारघर सेक्टर बारा मधील  नागरी आरोग्य केंद्रात जात असे,डॉक्टर तपासणी करून कोरोनाच्या टेस्टसाठी इंडिया बुल्स अथवा पालिकेच्या पनवेल येथील रुग्णालयात जावे लागत असे, आणि अहवाल प्राप्ती साठी दोन ते तीन दिवस थांबावे लागत असे,खारघर मध्ये कोरोना टेस्ट आणि 30 मिनिटात अहवाल प्राप्त होणार आहे. पालिकेने हे केंद्र सुरू करून खारघर वाशियाना दिलासा दिला आहे.
-प्रवीण पाटील
स्थायी समिती सभापती पनवेल 

--------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT