Diva Railway Station Esakal
मुंबई

Diva Railway Station: कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्या...प्रवाशांचा संताप, 40 मिनिटे रेलरोको; दिवा रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ

कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांनी दिवा रेल्वे स्टेशवर प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन खाली घसरल्याची घटना काल घडली आहे. या घटनेमुळे या रेल्वे मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेस यामुळं खोळंबल्या आहेत, तर कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर आज अनेक गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको केलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून संतप्त प्रवाशांना बाजूला करुन लोकल आणि एक्स्प्रेसची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. (Marathi Tajya Batmya)

जवळजवळ 40 मिनिटे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली होती. त्यानंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिस यशस्वी झाले. त्यानंतर पुन्हा लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूकसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती यावेळी रेल्वे आधिकाऱ्यांनी दिली आहे.

पनवेल-कळंबोली रेल्वे मार्गावर मालगाडीचे चार डबे घसरले

मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन खाली घसरल्याची घटना घडली आहे. पण या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, मेल-एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेस यामुळं खोळंबल्या आहेत, रेल्वे विभागाकडून ही माहिती देण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांचा सुमारास पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. यामध्ये चार वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे पाच डबे रेल्वे रुळावरून घसरल्यानं पनवेल ते कळंबोळी विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Spain vs Belgium : स्पेन १६ वर्षानंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत; मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल, बेल्जियमचे आव्हान संपुष्टात

Maharashtra Off-Budget Debt : महसुली तूट वाढली, महाराष्ट्रावर २८ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर; कॅगचा गंभीर इशारा

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT