goon sagar date arreted crime branch action mumbai police Sakal
मुंबई

Mumbai News : नामचीन गुंड डोळा दाते जेरबंद; हातात कोयता घेऊन फिरत असतानाच आवळल्या मुसक्या

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - जिल्ह्यातून तडीपार असतानाही शहरात खुलेआम फिरणाऱ्या नामचीन गुंडास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (वय 28) असे अटक आरोपीचे नाव आहे.

विशेषतः डोळा हा हातात कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दत्तनगर चौकातील प्रगती महाविद्यालय परिसरात राहणारा सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (वय 28) या पोलिस रेकॉर्डवरील नामचीन गुंडाला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

तरीही हा गुंड शहरात दाखल झाल्याची माहिती हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली. भोसले यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. गुंड सागर उर्फ डोळा दाते हा शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दत्तनगर प्रगती कॉलेजच्या समोर गार्डन परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन भटकत होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगल मूगले, उप निरीक्षक संजय माळी, दत्ताराम भोसले, विश्वास माने, बालाजी शिंदे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग या पथकाने गुंड डोळा दात्या याला जेरबंद केले. त्याच्याकडून प्राणघातक कोयता हस्तगत केला.

घातक शस्त्राने हल्ला करून परिसरात दहशत माजविण्याच्या 3 गुन्ह्यांसह एनडीपीएस कायद्यांतर्गत 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे डोंबिवली पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुंडाला कल्याण-डोंबिवली परिमंडळ - 3 हद्दीतून 6 जून 2023 पासून 18 महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 142 प्रमाणे कारवाई करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT