Mumbai News Sakal
मुंबई

Mumbai News : शुटिंग सुरू असताना मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या; घटनेनं कलाकारांमध्ये खळबळ

बिबट्या घुसल्यानंतर कलाकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या फिल्मसिटीमध्ये मालिकेच्या शुटींग दरम्यान सेटवर बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. बिबट्या सेटवर आल्यानंतर कलाकारांमध्यो मोठा गोंधळ उडाला. यावेळी त्याने एका कुत्र्यावर हल्ला केला असून कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, फिल्मसिटीतील मालिकेच्या सेटवर सकाळी शूटिंग सुरू असताना बिबट्या घुसला. यावेळी सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. पण बिबट्याला बघताच सेटवर मोठा गोंधळ उडाला असून कलाकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पण या घटनेमुळे कलाकार चांगलेच घाबरले आहेत.

गोरेगाव येथील फिल्मसिटीच्या बाजूलाच आरे जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीवरही अनेकदा बिबट्याने प्रवेश केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आरे वस्तीतील नागरिकांवरही हल्ला केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

https://www.facebook.com/reel/586405270313124

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT