measles patients sakal
मुंबई

Measles Infection : गोवंडी व कुर्ला ठरतोय गोवर संसर्गाचा हॉटस्पॉट!

मुंबई उपनगरातील गोवंडी व कुर्ला येथे गोवर संसर्ग रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने सध्या गोवंडी बरोबर कुर्ला ही गोवर साथीचे हॉट स्पॉट ठरत आहे.

जीवन तांबे

मुंबई उपनगरातील गोवंडी व कुर्ला येथे गोवर संसर्ग रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने सध्या गोवंडी बरोबर कुर्ला ही गोवर साथीचे हॉट स्पॉट ठरत आहे.

चेंबूर - मुंबई उपनगरातील गोवंडी व कुर्ला येथे गोवर संसर्ग रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने सध्या गोवंडी बरोबर कुर्ला ही गोवर साथीचे हॉट स्पॉट ठरत आहे.

मुंबईत कुर्ला, चेंबूर, गोवंडी, वडाळा, धारावी, कांदिवली, सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या ठिकाणी दाटीवाटीची लोकवस्ती आहेत. अशिक्षित, अस्वच्छता, प्रदूषण, डम्पिंग, लसीकरणाबाबत अंधश्रद्धा यामुळे सध्या गोवंडी व कुर्ला परिसरात गोवर च्या साथीने डोके वर काढले आहे. मुलांचे लसीकरण न केल्याने गोवरच्या रुग्णाच्या प्रमाण वाढत आहे. गोवंडी कुर्ला प्रमाणे बहुतांश विभागात मुस्लिम वस्तीत गोवर संसर्ग रुग्ण व बालकांचा मृत्यू झालेले पहायला मिळत आहे.

मुंबईत शहरात एकूण 142 पेक्षा अधिक रुग्ण आढळले असले तरी गोवंडी एम पूर्व विभागातील रफिक व बाबानगर व गोवंडी परिसरात एकूण 50 गोवर रुग्ण खालोखाल पालिका एल कुर्ला विभागात 13 गोवर रुग्ण आढळून आल्याने सध्या गोवर संसर्ग संख्येत गोवंडी, कुर्ला हॉटस्पॉट ठरला आहे. त्यात मृत्यूचे बाबत गोवंडी आघाडीवर आहे.

सध्या मुंबईत कामा करिता उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड राज्यातून कामगार मोठया प्रमाणात येत आहेत. मुस्लिम वस्तीत व बाहेरील राज्यातून आलेले कामगार यांनी आपल्या मुलांना सहा महिन्यांच्या फरकाने गोवरची लस 9 व 15 महिन्याला देणे बंधनकारक असताना देखील आपल्या मुलांचे लसीकरण करून घेतले नाही. मुंबईतील गोवंडी, कुर्ला, धारावी, चेंबूर, माटुंगा अन्य मुस्लिम वस्तीतील पालक व बाहेर राज्यातून आलेले कामगार आपल्याला मुलांचे लसीकरण करून घेत नाहीत. त्यांनी लसीकरण करावे यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी व वस्तीत जाऊन जनजागृती करतात. मात्र आपली मुले तापाने आजारी आहेत तसेच अन्य कारणे देत पालिका कर्मचारी व आरोग्य सेविका यांना ते परत पाठवून देतात.

आरोग्य केंद्र अथवा लसीकरण केंद्रावर मुलांना घेऊन या असे सागितले तरी ते चालढकल करतात. मुस्लिम वस्तीत सकारात्मक लसीकरण होत नसल्याने गोवंडी, कुर्ला व इतर मुस्लिम विभागात गोवर रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. लसीकरणाबाबत गैरसमजुती, अज्ञान याचे परिणाम बालकांना भोगावे लागत आहे. लसीकरण करून न घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

संपूर्ण मुंबई मध्ये गोवरचे 142 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण गोवंडी एम पूर्व गोवंडी शिवाजी नगर एम पूर्व परिसरात एकूण 50 तर कुर्ला एल विभाग - 31 रुग्ण आढळून आले आहेत. चेंबूर एम पश्चिम 7, मालाड पी नॉर्थ येथे 15, दादर धारावी, जी नॉर्थ येथे 13, सांताक्रूझ खार पूर्व एच ईस्ट येथे 11, वडाळा माटुंगा एफ नॉर्थ येथे रुग्ण संख्या 12आहे.

(गोवर उपद्रव गोवंडी प्रमाणे मुंबई, महाराष्ट्र व देशभर आहे. एकच मृत्यू झाला की समीक्षा केली जात नाही. मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले की लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात येते)

(याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे याची प्रतिक्रिया घेण्याकरिता संपर्क करीत आहे त्यांनी sms द्वारे मिटिंग मध्ये असल्याचे सांगितले आहे.)

(गोवरचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागवार घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले जात असून लक्षणे आढळणा-या मुलांना रुग्णालयात दाखल केले जाते आहे. गोवरचे रुग्ण झोपडपट्टीतील असल्याने या भागात जनजागृती केली जात आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT