मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येणे बंधनकारक! अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या काळात अनेक  कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामावर दांडी मारल्याचे समोर आले. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याने आठवड्यात एक दिवस कामावर हजर राहणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्याचा पुर्ण आठवड्याचा पगार कापण्यात येणार आहे. या संदर्भात शासकीय परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यावर शासकीय कार्यालयात अल्प कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थित काम सुरु होते. मात्र या काळात अनेक कर्मचारी कामावर आलेच नाही. तर अनेकांनी कुठलीही परवानगी न घेता मुख्यालय सोडून आपले गाव गाठले. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण येत होता. त्यामुळे कामाचे समान न्याय वाटपासाठी आठवड्यातील एक दिवस प्रत्येक कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश  देण्यात आले आहेत.

काय आहे परिपत्रकात

  • प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याने आठवड्यातून एक दिवस कामावर हजर राहावे 
  • त्यासाठी संबधित विभागाने रोस्टर तयार करावे 
  • मुख्यालय सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी
  • उपस्थित न राहीलेल्या कर्मचाऱ्याचा संपुर्ण आठवड्याचा पगार कपात
  • 8 जूनपासून हा आदेश अंमलात येणार
  • सर्व महामंडळ,आस्थापनेला हा आदेश लागू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

SCROLL FOR NEXT