corona tratment. 
मुंबई

शासकीय रूग्णालयातील शुल्क निधी कोरोना रुग्णांसाठी वापरणार

मिलिंद तांबे

मुंबई : शासकीय रुग्णालयात सामान्य नागरीकांकडून आकाराले जाणारे नाममात्र शुल्क आणि त्यातून जमा होणारा निधी रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी कोरोनासाठी वापरण्याची परवानगी नव्हती. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सदर निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना सामान्य नागरीकांच्या उपचारासाठी खर्च करण्यास राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने मान्यता दिली आहे.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करण्यासाठी नागरीकांकडून नाममात्र शुल्क आकारते. सामान्य नागरीकांकडून जे नाममात्र शुल्क आकरण्यात येते, ते शुल्क स्वीय प्रपंजी खात्यात जमा होते. सदरचा निधी शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशानुसार खर्च करण्यावर निर्बंध असल्यामुळे संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना सामान्य नागरीकांच्या उपचारासाठी खर्च करता येत नव्हता. 

सध्या कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य रुग्णांवर खर्च करण्यासाठी निधीची उपलब्धता त्वरित होणे आवश्यक होते. सदर बाब राज्यमंत्री यड्रावकर यांनी लक्षात आणून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून हा निधी खर्च करण्याची अनुमती घेतली.

राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे राज्यातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पूर्वी खर्च करण्यावर असलेल्या निर्बंधामुळे कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना निधी संदर्भात अनेक अडचणी येत होत्या. त्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT