Government Lawyer sakal
मुंबई

Palghar Crime : सात हजारांची लाच घेताना सरकारी वकिलाला अटक

पोलिस कर्मचारी निर्दोष असल्याचा अहवाल देण्यासाठी सरकारी वकिलाने मागितली लाच.

सकाळ वृत्तसेवा

पालघर - पोलिस कर्मचारी निर्दोष असल्याचा अहवाल देण्यासाठी सरकारी वकिलाने लाच मागितली होती. पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकील सुनील बाबूराव सावंत यांनी सात हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पालघर जिल्हा पोलिस दलातील नाईकपदावर असलेल्या कर्मचाऱ्यावर २०१५ मध्ये तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जून २०२३ मध्ये न्यायालयाने तक्रारदाराला निर्दोष जाहीर केले होते. त्यानंतर पालघर जिल्हा पोलिस दलाकडून तक्रारदाराने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाला देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सावंत यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोड करण्यात आल्यावर सात हजार रुपयांची रक्कम ठरवण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हुतात्मा स्मारकाजवळ उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलिस निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार ही रक्कम घेताना सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडण्यात आले. सरकारी वकील सुनील सावंत हे पालघर न्यायालयात सरकारी वकील म्हणून गेल्या सात वर्षांपासून काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT