मुंबई

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे धोरण अस्पष्ट - धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आयोगाने दिलेला अहवाल सरकार सभागृहामध्ये ठेवायला तयार नाही. मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणायला सरकार तयार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारचे नेमके धोरण काय आहे हे स्पष्ट होत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आयोगाने अहवालात ज्या शिफारशी केल्या आहेत, तो अहवाल सभागृहात सादर करा आणि अस्तित्त्वात असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणीही मुंडे यांनी केली. 

धनगर आरक्षणाबाबत या सरकारने टाटा इन्स्टिट्यूटकडे धनगर समाज मागास आहे की नाही याचा तपास करण्याचे काम दिले. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल येऊन आज एक महिना पूर्ण झाला, तरी सरकार या अहवालावर चर्चा करायला तयार नाही. सरकारने दोन्ही अहवाल सभागृहात ठेवले तर आम्ही कामकाज करायला तयार आहोत. टीसने धनगर समाजाच्या बाबतीत काय सांगितले आहे, खरेच धनगर समाज मागासलेला आहे की नाही हे महाराष्ट्रातील धनगर समाजाला कळणे आवश्‍यक आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. सत्तेमध्ये येण्याअगोदर धनगर समाजाबाबतीत पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. आज चार वर्षे झाली तरी धनगर समाजाला खेळवत ठेवण्याचे पाप देवेंद्र आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने केले आहे. त्यामुळे टीसचा अहवालही सभागृहात ठेवा, मग आम्ही चर्चा करायला तयार आहोत, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT