mumbai sakal
मुंबई

गजानन काळेचा अटकपुर्व जामिन न्यायालयाने फेटाळला

पत्नीचा छळ केल्याचे प्रकरण; गजानन काळेंचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पत्नीचा छळ व जातिवाचक शेरेबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी न्यायालयात(Court) धाव घेतलेल्या मनसेच्या (MNS) नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने (Thane District Court) फेटाळून लावला आहे. त्यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी (Police) शोधमोहीम सुरू केली आहे.

गजानन काळे याच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ करून जातिवाचक शेरेबाजी केल्याची तक्रार पत्नी संजीवनी काळे यांनी गेल्या आठवड्यात नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी छळवणुकीसह जातिवाचक शेरेबाजी करणे, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर काळे फरार झाले असून गेल्या १० दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत; तर दुसरीकडे काळे यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला.

  • पोलिसांकडून जामिनाला विरोध

गजानन काळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने, तसेच अटकपूर्व जामीन दिल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून, त्याचप्रमाणे संजीवनी काळे यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असे म्हणणे नवी मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात मांडले होते.

  • संजीवनी यांची राज ठाकरेंकडे धाव

संजीवनी काळे यांनी आपल्या वडिलांसह मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर धाव घेतली, परंतु ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन आपल्यावरील अन्यायाची त्यांना कल्पना दिला. तसेच आपल्याला व मुलाला धोका असल्याचे सांगून न्याय मिळावा, अशी मागणी केली. या वेळी शर्मिला ठाकरे यांनी याप्रकरणी राज ठाकरे यांना माहिती देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT