Cyclone Tauktae sakal media
मुंबई

ठाणे : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा; 70 शाळांची दुरुस्ती होणार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : किनारपट्टीपासून दूर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील (thane) ग्रामीण भागालाही मागील वर्षी ‘तौत्के’ या चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) जोरदार तडाखा बसला होता. या वादळात जिल्ह्यातील झाडे, घरे व शाळांचीदेखील पडझड झाली होती. आता यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी (Seventy School repairing work) सरकारकडून (Government) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. त्यात ७३ लाखांच्या निधीतून ७० शाळांची दुरुस्ती होणार असून, नुकसानग्रस्त शाळांना दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी १६ आणि १७ मे रोजी झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रातील परिसराला चांगलाच तडाखा बसला. या वादळात किनारपट्टी भागातील अनेक झाडांची व घरांची पडझड झाली होती. या वादळ पीडितांना सरकारी मदत प्राप्त झाली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी या भागातील जिल्हा परिषदांच्या ७० शाळांच्या इमारतींचेही वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शाळांची दुरुस्ती करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शालेय शिक्षण विभागाकडे देण्यात आला होता.

शालेय शिक्षण विभागाकडून हा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झाला होता. या प्रस्तावानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुसज्ज वर्गखोल्या मिळणार

जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या २८८ वर्गखोल्यांपैकी ‘तौत्के’ चक्रीवादळाचा तडाखा ७० शाळांना बसला होता. या शाळेतील ११९ वर्गखोल्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता, जिल्ह्यातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी सुसज्ज अशा वर्ग खोल्या मिळणार आहेत.

अपेक्षित खर्च धरून निधी

ठाणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शाळांचे काही ठिकाणी पत्रे उडून गेले होते; तर काही शाळांच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी ७० हजारापासून ते एक लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार ७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तौत्के चक्रीवादळात शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून सरकारकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच त्याचा पाठपुरावादेखील करण्यात आला. आज या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- सुभाष पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे

शाळांचा आढावा

तालुके नुकसानग्रस्त शाळा संख्या
अंबरनाथ १५
भिवंडी १६
कल्याण ०५
शहापूर १४
मुरबाड २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT